Tuesday, 6 May 2014

कार्यालय, इंटरनेट ब्लॉग तथामोबाईल एंड्राइड अँपचे उद्घाटन

तळोदा- अक्षयतृतीयेच्या शुभमुहर्ता वर तळोदा तालुका पत्रकार संघातर्फे संघ कार्यालय, इंटरनेट ब्लॉग तथामोबाईल एंड्राइड अँपचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष चन्द्रशेखर बेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक काळात मोबाईलचा अतिवापरामूळे प्रत्येक युवक बातमी इंटरनेटद्वारे वाचण्याचा प्रयत्न करतो.याकरिता पत्रकार संघाचे सदस्य सुधाकर मराठे यांनी इंटरनेट ब्लॉग व मोबाईल वापरकर्त्यासाठी अन्ड्रोईड अप तयार केले. या इंटरनेट ब्लॉगला 19
हजार पेक्षा अधिक लोकांनी भेट देऊन ब्लॉग ची माहिती घेतली. तळोदा येथील सुभाष चित्र मंदिरच्या जागेवर बांधण्यात आलेल्या सी. टी. मार्केट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांना चित्र मंदिराची आठवण पडू नये म्हणुन पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र लोहार, सुधाकर मराठे, किरण पाटील यांनी वर्ष भरात पत्रकार संघा तर्फेघेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या चित्रफीती प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष चन्द्रशेखर बेहरे होते प्रमुख पाहुणे म्हणुन धूळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाणे, दिनेश रावल, नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार सघाचे अध्यक्ष रमेश महाजन, पत्रकार अशोक जैन रत्नदीप पाटिल जीवन पाटिल राकेश कलाल देवेंद्र बोरसे, हिरालाल चौधरी, धर्मेंद्र पाटील संतोष पाटील आदि उपस्थित होते यावेळी हेमंत मदाणे ,अशोक जैन यांनी तळोदयातील पत्रकारांच्या उपक्रमाचे कौतुक केले पत्रकारितेत कुठलाही भेदभाव न करता सडे तोड पत्रकारिता करा ज्यातून समाजाचा विकास होइल असे आवाहन केले या कार्यक्रमाला तळोदा पालिकेचे प्रतोद भरतभाई माळी
नगराध्य्क्षा सौ योजना माळी उपनगराध्य्क्ष गौरव वाणी भाजपचे डॉ शशिकांत वाणी
उदेसिंग पाडवी नगरसेवक संजय माळी अनिल माळी अजय परदेशी अनूप उदासी राजेन्द्र राजपूत कॉ जयसिंग माळी पोलिस निरीक्षक विजय जाधव उपनिरीक्षक पी जी राठोड अभियंता वतनकुमार मगरे पचायत समीति सभपती आकाश वळवी शिवसेनेचे जितेन्द्र दुबे आनंद सोनार देवा कलाल जेष्ट शिवसैनिक संजय पटेल मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे पृथ्वीराज राजपूत सुभाष कलाल रुपसिंग पाडवी आपचे संदीप वळवी बार असोसियशनचे संजय पुराणिक सचिन राणे संदीप पवार व्यापारी संघटनेचे हुकुम जैन डॉक्टर संघटनेचे डॉ अमर राजकूले डॉ जगदीश मराठे डॉ योगेश्वर पंजराळे गणेश सोशल ग्रुपचे हितेंद्र क्षत्रिय योगेश मराठे जितेन्द्र माळी मनस्पोर्टचे भरत चौधरी संदीप परदेशी कमल परदेशी कमलेश पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी उपाध्यक्ष फुन्दिलाल माळी, सचिव उल्हास मगरे, कोषाध्यक्ष महेंद्र लोहार, सदस्य सुधाकर मराठे, विकास राणे, ईश्वर मराठे, चेतन इंगले,किरण पाटिल, प्रवीन भारती, यांनी परिश्रम घेतले. ए टी वाघ (सर) मंगेश पाटिल कायदेशीर सल्लगार संजय पुराणिक जेष्ट पत्रकार भरत भामरे यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचालन फुन्दिलाल माळी यांनी तर प्रास्ताविक उल्हास मगरे यानी तर आभार कालीचरण सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमाला गावातील जेष्ट व सर्व क्षेत्रातील नागरिकानी उपस्थिती लावुन पत्रकार संघाचे कौतुक केले...

जागृत देवस्थान कनकेश्वर महादेव मंदिर

 
"जागृत देवस्थान कनकेश्वर महादेव मंदिर"
तळोदा शहरापासून सुमारे एक (१) किलो मीटर अंतरावर  तलोदा शहादा रस्त्यावर आमलाड़ शिवारात कनकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. वृक्षानी वेढलेल्या या मंदिरात आलेल्या भाविकांना निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराचे चिंतन करण्याचा वेगला आनंद मिळतो. येथील शांतता दर्शनासाठी आलेल्या सर्वानाच आपल्याकडे आकर्षित करते व परमेश्वराच्या नामस्मरनात भाविकांना तल्लीन होण्यास मदत करते.येथील महादेव मंदिर पूर्वमुखी असून गाभाराबाहेर नंदिची सुरेख मूर्ति आहे. या मंदिर परिसरातच गजानन महाराज, अंबिका माता, दत्त गुरु यांचेही मंदिरे आहेत. याच परिसरातपवनसुत हनुमानाचे परिसरातील एकमेव असे पच्छिममुखी मंदिर आहे त्यातील हनुमानाची मूर्ति  पाषाणात कोरलेली रेखीव मुर्ती आहे.या सर्व मंदिरांमुळे या महादेव मंदिर परिसराला आगळे वेगळे
असणारे कनकेश्वर महादेव मंदिर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे विविध कार्यक्रमाची रेलचेल असल्यामुळे भाविकांची गर्दी होते. त्यातच पवित्र श्रावण महिन्यात तर भाविकांच्या गर्दिने परिसर फुलून जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी कनकेश्वर महादेव मंदिर परिसराला भेट देणार्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.स्वरुप प्राप्त
 झाले आहे. याच परिसरात प्राचीन विहीर आहे. या विहिरीत उतरन्यासाठी पायरयांची सोय केलेली दिसते. पायऱ्याची विहीर बांधन्याची पद्धत इंन्दोर राजमाता शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील असल्यामुळे ही विहीर व महादेव मंदिर यांच्या काळातील असण्याची शक्यता जानकार व्यक्त करतात. शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी गावोगावी मंदिरे बांधन्यासाठी त्या काळात मदत देखिल केली होती. त्यातच त्या काळात तलोदा देखील बारगळ जहाग़ीरदरांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या मंदिराच्या उभारनीत देखिल अहिल्याबाई होळकरानी मदत केली असावी अथवा त्या काळातील असावे, असाही अंदाज जानकरानी व्यक्त केला आहे. त्यामुळे या मंदिराला 200 वर्षाचा इतिहास असल्याचे मत जानकरांनी व्यक्त केले आहे. या मंदिर परिसरात कायम स्वरूपी पत्र्याचा मंडप टाकण्यात आलेला आहे.
सुशोभिकरणासाठी फरशी ही बसवण्यात आली आहे. गजानन महाराज मंदिर व मंडप तसेच सर्व कामे दानशुर व्यक्तिनी केलेल्या दानामुळेच करता आल्याचे मंदिराच्या ट्रस्टीनी सांगितले. याच मंदिर परिसरात अनेक धर्मिक कार्यक्रम पार पडत असतात.1993 पासून येथे दरवर्षी श्रीमद भागवत छाया सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. विविध धार्मिक कार्यक्रम तसेच लग्न कार्य ही या ठिकानीच पार पडली जातात. परिसरातील बालगोपाल मंडली या मंदिराला भेट देतात. एकदिवसीय सहलीच्या आनंद घेतात त्या मुले या मंदिर परिसराला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे या आदीवसि पट्ट्यातील महत्वाची यात्रा म्हणजे अश्वथामा यात्रा या यात्रेतील भाविक देखील परतीच्या प्रवासात कनकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात त्यांची ही अवघड सतपुडयातील दरया खोर्यातील अश्वसथामा यात्रा महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होत असे , असे सांगितले जाते म्हणून या यात्रेतील भाविकांचे कनकेश्वर मंदिर परिसर विश्रातीचे स्थळ होत असे असे जानकार सांगतात. तलोद्या तालुक्यातील
 धार्मिक व सांकृतिक कार्यात कनकेश्वर महादेव मंदिर व परिसराला महत्वाचे स्थान आहे. परंतु या मंदिर परीसराकड़े येनार्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. कनकेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन या परिसरात विविध
सोयी सूविधा पुरविल्या जातात याच परिसरात धर्मशाला देखील आजही आपले असतीत्व टिकून आहेत येनार्यांची सोय या ठिकाणी केली जाते सध्या या मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष आमलाड येथील उद्ववभाई प्रल्हादभाई पटेल हे आहेत. त्यांच्या देखरेखे खाली व् सहकारया च्या मदतीने या मंदिर परिसरातील विविध कामे सुरु आहेत व् मंदिराची देखरेख ठेवली जाते.





ऐतिहासिक बारगळ गढी


 तळोदा- उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्‍या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. तळोदा गाव बारगळ जहागीरदारांना इनाम म्हणून प्राचीनकाळी मिळालेले. त्यामुळे या परिसरावर संस्थानिक बारगळ जहागीरदारांचे वर्चस्व। त्यामुळेच संस्थानिक राणा मानसिंग यानी शिवाजी बारगळ यांचे पुत्र भोजराज याना तळोदे हे गाव इनाम दिले. कालांतराने बारगळ व संस्थानिकात वाद निर्माण झाले. त्यांचे पर्यावसान युद्धात होऊन बारगळानी पूर्ण संस्थान काबिज केले. पुढे समजोता होऊन हे संस्थान परत करण्यात आले व लढाईच्या खर्च्याबद्दल बारगळाना तळोदा गावाची हद्द वाढवून मीळाली. राणानी बारगळाच्या पत्नीस बहिन मानले व या नात्याने दोन्ही घरातच कायमस्वरूपी
स्नेहभाव निर्माण झाला. तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी 1962 मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे.
जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७
रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय 16 मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम अँबाँक्युशन अँक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला. सन १८६७  चा गँझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.






Friday, 2 May 2014

जाहीर आमंत्रण

                                   तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर आमंत्रण

                     
 तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व संघाच्या ब्लॉग तसेच अँन्ड्रॉईड ऍपचा शुभारंभ पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांच्या हस्ते आज दि. 2 मे रोजी करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रमेश महाजन, हेमंत मदाने, रमाकांत पाटील, अशोक जैन, राकेश कलाल, रणजीत राजपूत, धर्मेंद्र पाटील, देवेंद्र बोरसे, मुकेश सोमवंशी, हिरालाल चौधरी, विशाल माळी, संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार्या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष फुंदीलाल माळी, सचिव उल्हास मगरे, खजिनदार महेेंद्र लोहार, विकासदीप राणे, ईश्वर मराठे, प्रविण भारती, सुधाकर मराठे, गणेश देसले, चेतन इंगळे, किरण पाटील यांनी केले आहे. सदर कार्यक्रम येथील सी.टी.मार्केटमध्ये सायंकाळी 5 ते 8.30 दरम्यान होणार आहे.

Thursday, 1 May 2014

आदिशक्ती कालीकादेवी


शहराचे आराध्य व जागृत दैवत आदिशक्ती कालीकादेवी मातेच्या यात्रेला वै शाख शुद्ध 3 दि 2 में पासून प्रारंभ होतो  यापरिसरात शेवटची यात्रा असते शहरात खर्डी नदीच्या  तीरावर वटवृक्षाखाली वसलेले नवसाला पावणारी व  भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी कालिकामाता मंदिर आहे अक्षय्य तृतीयेपासून आठ दिवस यात्रा भरते या नंतरही यात्रासुरुच राहते तालुका परिसरातुन हजारो भक्तगण दर्शनासाठी  मंदिरात रांगा लागत असतात पूर्वी यात्रा खर्डी नदिपात्रात भरत असे  कालां तराने यात्रा आठवडे बाजारात भरु लागली असून तळोद्याची  यात्रा म्हटली म्हणजे पुर्वी वर्षाला लागणारे संसार उपयोगी वस्तु  भांडी मसाले,कांदा , लसून व विशेष म्हणजे बैल जोड़ी ,
लाकडी मजबूत टिकाऊ बैलगाड़ीसाठी खान्देशात प्रसिध्द होती.  तळोद्यातील बैलगाड़ी खरेदी करण्यासाठी शेतकरी हजेरी लावत असत  तसेच व्यापारीही हजेरी लावत मात्र यांत्रिक युगात लाकडी बैलगाडी ला  मागणीत घट झाली आहे तसेच बैलजोडी खरेदी विक्री मोठ्या होत असते  खर्डी नदी शेजारी बैलविक्री बाजारात लाखो रूपयांची उलाडाल होते या बैल बाजारासाठी तळोदा कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे व्यापा-यांसाठी पाण्याची दीवा बत्तीची व्यवस्था करण्यात येते यात्रेत विवीध प्रकारचे पाळणे सर्कस मौत का कुवा डॉगी शो लोखंडी साहित्याचे व्यापारी  भांड्याचे व्यापारी लसून कांदा मसाले दुकाने थाटतात विशेष म्हणजे
भांड्याचे व्यापरियात्रा संपल्या नंतरही पंधरा दिवस असतात तळोदा  पालिकेत यात्रेकरुच्या सुविधा पुरवीण्यासाठी परिश्रम घेत असतात