Thursday, 1 May 2014

आदिशक्ती कालीकादेवी


शहराचे आराध्य व जागृत दैवत आदिशक्ती कालीकादेवी मातेच्या यात्रेला वै शाख शुद्ध 3 दि 2 में पासून प्रारंभ होतो  यापरिसरात शेवटची यात्रा असते शहरात खर्डी नदीच्या  तीरावर वटवृक्षाखाली वसलेले नवसाला पावणारी व  भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी कालिकामाता मंदिर आहे अक्षय्य तृतीयेपासून आठ दिवस यात्रा भरते या नंतरही यात्रासुरुच राहते तालुका परिसरातुन हजारो भक्तगण दर्शनासाठी  मंदिरात रांगा लागत असतात पूर्वी यात्रा खर्डी नदिपात्रात भरत असे  कालां तराने यात्रा आठवडे बाजारात भरु लागली असून तळोद्याची  यात्रा म्हटली म्हणजे पुर्वी वर्षाला लागणारे संसार उपयोगी वस्तु  भांडी मसाले,कांदा , लसून व विशेष म्हणजे बैल जोड़ी ,
लाकडी मजबूत टिकाऊ बैलगाड़ीसाठी खान्देशात प्रसिध्द होती.  तळोद्यातील बैलगाड़ी खरेदी करण्यासाठी शेतकरी हजेरी लावत असत  तसेच व्यापारीही हजेरी लावत मात्र यांत्रिक युगात लाकडी बैलगाडी ला  मागणीत घट झाली आहे तसेच बैलजोडी खरेदी विक्री मोठ्या होत असते  खर्डी नदी शेजारी बैलविक्री बाजारात लाखो रूपयांची उलाडाल होते या बैल बाजारासाठी तळोदा कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे व्यापा-यांसाठी पाण्याची दीवा बत्तीची व्यवस्था करण्यात येते यात्रेत विवीध प्रकारचे पाळणे सर्कस मौत का कुवा डॉगी शो लोखंडी साहित्याचे व्यापारी  भांड्याचे व्यापारी लसून कांदा मसाले दुकाने थाटतात विशेष म्हणजे
भांड्याचे व्यापरियात्रा संपल्या नंतरही पंधरा दिवस असतात तळोदा  पालिकेत यात्रेकरुच्या सुविधा पुरवीण्यासाठी परिश्रम घेत असतात

No comments:

Post a Comment