तळोदा स्वतंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या तलोद्यातील इतिहासाची साक्ष् देणारी बारगढ़ गढ़ीच्या भेटीला 76 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने गढ़ीत जाऊन सावरकर प्रतिमा पूजन करून बालगोपाला समोर सावरकरांच्या आठवणींना उजाळा देत स्मृति जागवल्यात. तळोदा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्व झोकूनदेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारत भेटीत तळोद्यात दि.१३ मार्च १९४० रोजी भेट दिली होती. त्या भेटीला १३ मार्च २०१६ रोजी 76 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त त्याच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी बारगढ़ गढ़ीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सावरकर यांच्या तळोद्याचे जहांगीरदार शंकरराव बारगढ़ यांच्या हस्ते सत्कार केलेल्या दुर्मिळ प्रतिमेंचा पूजन व परिसरातील बाल गोपालांना
स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देणारे सावरकर यांच्या धेर्याचा व शौर्याचा आठवणी बाळ गोपालांनी उत्सुकतेने श्रवण केल्या. पत्रकार संघातर्फे बालगोपालांना चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बारगड जहागीरदार यांचे वारस असलेले प्रसन्नकुमार बारगढ़, प्राचार्य अशोक वाघ, तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव उल्हास मगरे, फुंदीलाल माळी, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, किरण पाटिल, चेतन इंगळे, सम्राट महाजन आदीच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी प्रा अशोक वाघ यांनी मनोगतात सावरकर यांच्या कार्याचा स्मृती जागवल्यात...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. आभार ईश्वर मराठे यांनी मानले....
No comments:
Post a Comment