Saturday, 30 August 2014

एखाद्याचे केस पांढरे झाले म्हणून त्याचे शहाणपण, प्रगल्भता मापता येत नाही. ज्ञानेश्वरानी १६ व्या वर्षीच जे तेज दाखविले त्याला तोंड नाही. किती जगलात त्यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचे आहे. त्या कसोटीवर तळोदे तालुका पत्रकार संघाचे वय अवघे एक वर्ष असताना जे उपक्रम राबविले, ज्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले त्यामुळे सर्व तालुक्यातील जनता स्तिमीत झाली. अर्थातच हे सारे उपक्रम यशस्वी झाले ते दानशूर व्यक्ती, गुणग्राहक समाज व पत्रकार संघाची विश्वासहर्ता यामुळेच. स्वत:च्या पोळीवर तूप ओढुन घेणारे अनेक असतात. काही महाभाग तर दुस-याचेही तुप ओढुन घेणारे असतात. पण हां पत्रकार संघ संस्कृती जपणारा आहे. विकृती जोपासणारा नाही हे उन, वारा, पावसात, थंडीत काल जगात व आपल्या गावात काय घडले त्याची वित्तबातमी
पोहचवणारे घरोघरी वृत्तपत्र पोहचविणारी कष्टकरी मंडळी प्रकाश परदेशी, रविंद्र शिंपी, श्रावण परदेशी, किशोर शिंपी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घडवुन आणला ही कृतज्ञता अनेकांना भावली तशा भावनाही त्यानी व्यक्त केल्या. म्हटले जाते - जरी ते खरे नसले तरी. याउलट एक पत्रकार दस-या पत्रकाराला कधीच चांगले म्हणत नाही. पण हां पत्रकार संघ चांगल्याचे कौतुक करतो व एकत्रही राहतो एकोप्याने काम करतो हे एक सुखद आश्चर्यच आहे. सतेचा गुळाला मुंगळा चिकटावा किंवा खुर्चीला ` फेविकोलका मजबूत जोड़ ' ही फिका पडावा, अनुभव सर्वाना येतात असे, पण या पत्रकार संघाच्या पदाधिका-यानी वर्ष झाल्याबरोबर राजीनामे दिले व नविन कौल घेतला. आजचा जगात काही पुढारी पत्रकार पाळतात, काही पोलीस पाळतात, काही उद्योगपती पाळतात, असे प्रख्यात पत्रकार एम्.जे.अकबर म्हणतात. पण या पत्रकार संघातील सद्स्यानी कोणी पाळु शकणार नाही. आजकाल सारेच विकाऊ नाहित. म्हणुनच टिकाऊ असतात ह्यामुळे जनतेचा विश्वास सर्व सदस्य गमावणार नाहित असा आम्हालाही विश्वास आहे. त्यामुळे आम्ही या पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो व पुढील दमदार वाटचालीस साथ देण्याची ग्वाही देतो.
                                                                                                      प्रा. ए.टी.वाघ ९४२३४९७००३

Monday, 25 August 2014

Taloda samachar



बैल पोळा

उन्हातान्हात दिवसभर राबणार्‍या, बळीराजाचा आजन्म मित्र, मायबाप असणार्‍या बैलांच्या विश्रांतीचा,
त्यांच्या कष्टाचे कौतुक करणारा वर्ष सण म्हणजे बैलपोळा होय. कर्नाटकात यालाच बैंदूर असेही म्हणतात. बैल पोळा हा श्रावण अमावास्या अर्थातच पिठोरी अमावास्येला महाराष्ट्रात सार्ज‍या होणार्‍या या सणाला विशेष महत्त्व आहे. शेतकर्‍याकरिता हा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवाच जणू. या दिवशी आपल्यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या सर्जा-राजाला मनोभावे सजवण्याचीच जणू बळीराजांमध्ये स्पर्धा सुरू असते. ग्रामीण भागात गावोगावच्या चावड्यांसमोर बैलांना सुशोभित करीत त्यांच्या मिरवणूका काढल्या जातात. बैल सुशोभनाच्या स्पर्धा, तसेच बैल गाड्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यंदा न्यायालयाने बैलगाड्यांच्या स्पर्धांवर बंदी घातली असल्याने या स्पर्धा यंदा भरवल्या जाणार नाहीत, असे दिसते. शेतकर्‍यांच्या घरोघरी पुरणपोळ्यांचा घास आज सर्जा-राजाच्या कष्टाकरिता कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बनवला जातो. शहरी भागातले चाकरमानी आजच्या दिवशी मातीच्या बैलाच्या प्रतिकृतींची पूजा करतात आणि ज्यांनी आपल्याला घडवलं त्या सर्जा-राजाची आठवण काढतात. आपला देश शेतीप्रधान असल्याने या देशात बैल पोळा या सणाला महत्त्व आहे. ग्रामीण भागातील शेतकरी हा कृषिप्रधानतेवर अवलंबून असल्याने तो आपला उदरनिर्वाह शेतीवरच करत असतो. शेती म्हटली की, ती बैलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ऊन, वारा, पाऊस असो अशा कोणताही ऋतू असला, तरी बैलांकडून शेतीचे काम करून घेतले जाते. यामध्ये बैलांना कोणत्याही प्रकारचा आराम मिळत नसतो. बैलांना आराम मिळावा,
यासाठी हा सण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही ठिकाणी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते, त्यांच्या अंगावर रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. बैलांना सजवून गावातल्या गावात त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांच्या अंगावर गुलाल फेकला जातो. बैलांना गावतल्या गावात मिरवले जाते. प्रत्येकांच्या घरासमोर जाऊन बैलांची पूजा केली जाते. - या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात.
मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास 'बैलपोळा' असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' या दिवशी, बैलांचा थाट असतो.
या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा,
 नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.
पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या
शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो. याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

Saturday, 9 August 2014

वाल्हेरी धबधबा

सातपुडयाच्या पर्वतरांगा उंच उंच डोंगर, खोल द-या पक्षांचा किलबिलाट वटवृक्षांच्या वेलीचे झोके हिंस्त्र
प्राण्यांचा वावर नागमोडी रस्ते, हिरवा शालु कौलारू घराचे दर्शन फेसाळणा-या धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण पावसाळा म्हटला म्हणजे निसर्गप्रेमीसाठी एक पर्वनीच असते. पावसाळयात निसर्गाला वेगळाच बहार येतो. डोंगरद-यांमधुन वाहणारे पाणी, सातपुडयाच्या पर्वतरांगांमधील विविध पक्षांची किलबिल मनाचे पारणे फेडत. डोंगर कपा-यातुन कोसळणारे धबधबे पर्यटकांना साद घालु लागतात. अश्यापैकी एक म्हणजे तलोदा तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधबा आहे. दरवर्षी पावसाळयात सातपुडयाच्या पर्वत रांगेत जोरदार पर्जन्यवृष्टी होते. उंचावरुण कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी गुजरात, महाराष्ट्रासह सिमेलगत असलेल्या गावातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. महाविद्यालयीन तरुण- तरुणी यांच्यासह प्रेमीयुगलांसाठी येथील निसर्गरम्य
वातावरण म्हणजे त्यांच्या स्वप्नातील स्वर्गच आहे. धबधबा म्हणजे निसर्गाचा चमत्कार. या धबधब्याखाली डोंगर रांगांमधुन कोसळणारे जलतुषार अंगावर झेलण्याची पर्यटकांमधे जणु स्पर्धाच लागलेली असते. नीळे आकाश प्रचंड उंचीने कुणालाही सहजपणे व्यापतील असे डोंगर, पक्षाचा किलबिलाट हे अगदी मनाला मोहीत करते. तळोदा शहरापासुन काही किलोमिटर अंतरावर वाल्हेरी गाव असुन याच ठिकाणी हां धबधबा आहे. पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. सुट्टीच्या दिवशी निसर्गप्रेमी व पर्यटकांच्या गर्दीने परिसर फ़ुलुन जातो. वाल्हेरी गावात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहीले आकर्षण असते ते पारंपारीक कौलारु घरेधबधब्याकड़े जाण्यापुर्वीच रस्त्यावर असलेले एक विशालकाय वेली असलेले वटवृक्ष. यावर परिसरातील लहान मंडळी झोका खेळताना दिसतात. पर्यटकांना या झोक्याचे मोह आवरेनासे होते. गावात व परिसरात मोरांसह विविध पक्ष्यांचे वास्तव्य आहे.परिसरात विविध जंगली प्राणी ज्यात वाघ, अस्वल देखील आढ़ळतात. गावातुन धबधब्याकडे जाताना नदीच्या किनारी वाल्हेरी मातेचे मंदीर लागते. पारंपारिक कौलारू छते असलेले घरे मंदिराच्या परिसरात विविध रंगाची फुले व वनस्पती लावल्याने परिसर अतिशय शोभुन दिसतो. तिथुनच पुढे नागमोळी वाटेला धबधब्याकड़े जाणारा मार्ग
आहे. रस्त्याच्या आजुबाजुला टेकडयांनी जणु हिरवा शालुच नेसला आहे असा भास होतो. नागमोळी रस्त्याने जाताना कोकीळेचा मंजुळ सुर कानी येतो. उंच टेकडयांवर व नदीच्या कुरणात वावरणारी गुरे सोबत काठी घेवुन त्यांचावर पहारा करणारा थुई थुई नाचणारा मोर गुराखी गुरांना विविध आवाज काढुन मनोरंजन करतो. नागमोडी वळण संपल्यानंतर काहीअंतरावरच शुभ्र फेसाळलेले दोन धबधबे नजरेस येतात. त्यातुन उंच व मोठ्या धबधब्याकड़े जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. 50 फूटापेक्षा अधिक उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधब्याच्या काही अंतरावर असलेल्या जागेवर किंवा धबधब्यावरील परिसरात चुल पेटवण्यासाठी इंधन गोळा करतात निसर्गरम्य परिसर धबधब्यावरुण पडणारे पाणी त्या पाण्यावरुण ठिबकणारे पाण्याचे थेंब पाहुण पर्यटक अचंबीत होतात. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात राहुन पुढील वर्षाचे नियोजन करुण सायंकाळी गावाकडे परततात. दरवर्षी पावसाळयात या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी शहरी भागातील पर्यटकांची विशेषत: गर्दी असते. या नैसर्गिक सौंदर्याचे जतन होण्याची नितांत आवश्यकता आहे....






पर्यटकांना खुणावणारा निसर्गरम्य सातपुडा

पर्यटकांना खुणावणारा निसर्गरम्य सातपुडा
पर्यटकांना खुणावणारा तळोदा तालुका 
सातपुडयाला जशी ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे त्याच्या नैसर्गिक सौदर्याची ख्याती काही ओंरच आहे, सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुका असून तालुक्यातील उत्तरेकडील भाग सातपुडयाच्या पर्वतरांगेत येतो तालुक्यात अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत या निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना खुणावणारा तालुका म्हणुन ओळखला जातो. पावसाळ्यात सातपुडयाची सफर म्हणजे डोळयाचे पारणे फेडण्याचा खरा आनंद नजर टाकावी तिकड हिरवळीचे सम्राज्य दिसते जणू सातपुडा हिरवा सूट परिधान करून आपल्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचा भास होतो या हिरवळीत अधूनमधून डोंगरावरून कोसळणारे लहान- मोठे पांढरे स्वच्छ धबधबे सातपुडयाचे सौदर्य अधिकच खुलवितात पावसाळयाच्या दिवसात तळोदा- धडगांव रस्त्यावरील चांदसैली घाट सातघोल गो-या माळकड़े जाणारी नागमोडी पायवाट पर्वत रांगात असलेल्या पायवाटेने प्रवास खरोखरच निसर्गप्रेमींना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही तालुक्यात कोठार, हिड़ाबाजंगल,खर्डी, आमोनी, वाल्हेरी, गोरामाळ, कुंडलेश्वर व रावलापाणी संग्राम अदि ठिकाणाचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध असणारी एकमेव अश्वत्थामा यात्रा सर्वाचे आकर्षणाचे केंद्र आहे तालुक्यात सातपुडयाच्या पहिल्या पुडयात असलेले कुंडलेश्वर हे ठिकाण पुरातन महादेव मंदिर व गरम पाण्या चे झरे आहेत पावसाळा व श्रावण महीन्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते वाल्हेरी येथील डोंगरद-यातून वाहाणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात धबधब्याकडे जाणारी पायवाट पायवाटेवरुण चालत आसतांना पक्षांची किलबिलाट निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी मोर पक्षांचे अस्तित्व आढ़ळून येते गावाजवळ वाल्हेरी माताचे मंदिर येथे शैक्षणिक सहल व पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमानवर गर्दी असते व इतर ठिकाणी पर्वत रांगात पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे असे सर्वत्र नयनरम्या डोळ्याचे पारने फ़ेडणारे दृश्य दिसते

तळोदेकरांचे टिळकांवरील प्रेम

`स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणी तो मी मीळवनारचं ' अशी सिंहगर्जना करुण लोकमान्य
टिळकांनी स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिश सरकारविरुद्ध एल्गार पुकारला या घोषणेने स्वातंत्र सेनानींमधे स्फुलींग चेतवण्याचे काम केले. जनतेला एकत्र करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात त्याकाळी केली. त्यामुळे स्वातंतत्र्यकाळातील प्रेरणादाई इतिहासाची आठवण करुन देणारे तळोदा येथील स्मारक राज्यातील एकमेव कायमस्वरूपी स्मारक म्हणुन ओळखले जाते. तळोद्यातील गणपती मंदिर व लोकमान्य टिळकांचा पहिला पुतळा 94 वर्षात पदार्पण करीत आहे. ब्रिटीशाना खड़साविणारे आणि प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र लढ्यात सहभागी होऊन इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारणा-या लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र लढ्याची तळोदा शहराशी नाळ जुडली आहे. तळोद्यातील गणपती मंदिराचा स्वातंत्र्य संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तळोद्यातील गणपती मंदिराचा कमाणीवर लोकमान्य टिळकांचा एकमेव पुतळा आहे. तळोद्यातील संस्थानिक श्रीमंत कृष्णराव आनंदराव बारगळ जहागीरदार यांची मुंबई येथील सरदारगृह हॉटेलात लोकमान्य टिळकांशी भेट झाली. त्यावेळी त्यांच्या भारत स्वातंत्र करण्याच्या मुद्यावर दोघांमधे विचारांचे आदान-प्रदान व्हायचे. बारगळ जहागिरदारांच्या आग्रहास्तव टिळकांनी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन तळोद्याला येण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे खान्देश दौ-यादरम्यान तळोद्यात बारगळ गढीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. तालोद्याकडे येत असताना धुळयाजवळ टिळक आजारी पडले. त्यामुळे
टिळकांचे ख़ास सहकारी विचारवंत न.चि.केळकर याना पाठविले व सभा पार पडली. स्वातंत्र संग्रामात टिळकांशी संबंध आल्याने ब्रिटिश सरकारला राग आला. त्यावेळी खान्देश कलेक्टर नाईट यानी बारगळाचे शस्त्र जप्त करण्याचे आदेश देवुन त्या कारवाईत पाच बैलगाड्या, बंदुका, तलवार, दानपट्टे, भाले, धनुष्यबान, छोट्या तोफा जप्त करण्यात आले. मात्र तळोदेकरांचे टिळकांवरील प्रेम, त्यांचे विचार मनात रुजत गेले. टिळकांच्या स्वातंत्र लढ्यात सहभाग वाढतच गेला. १ ऑगस्त १९२० रोजी टिळकांचे निधन झाले. तेव्हा बारगळानी शाही पालखीत टिळकांचा फोटो ठेवुन तळोद्यातुन प्रतीकात्मक शव यात्रा काढुन हातोड़ा नदीवर जावुन विधी केला. शोभायात्रेत संपूर्ण तालुका परिसरातुन जनसागर लोटला होता. श्रदांजली वाहताना
कृष्णराव बारगळ यांनी टिळकांचे स्वातंत्रासाठी दिलेले योगदान, समाज जागृती, ऐक्य, संस्कृती जतनासाठी टिळकानी शिवजयंती व गणेश्तोत्स्व सुरु केले आहे. या लोकमान्यचे स्मरण रहावे, पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, इतिहासाची आठवण रहावी म्हणुन बारगळानी इच्छा व्यक्त केली. त्यात लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर सवंत १९२१ ला एक वर्षाच्या आत गणपती मंदिर बांधुन त्या मंदिराच्या प्रवेश कमाणीवर लोकमान्य टिळकांच्या संगमरवरी दगडाच्या पुतळा बसविण्यात आला. जिल्ह्यासह राज्यात एकमेव टीळकांचे स्मारक म्हणुन ओळखले जाते. टिळकांच्या स्मृती जोपासत तळोद्यातील स्मारक मंदिर आहे. गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमाणीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा सण २०१४ साली ९४ वर्षात पदार्पण करत आहे.







Monday, 4 August 2014

कानबाई

कानबाई खान्देशाची आराध्य दैवत म्हणुन कानबाई उत्सव सर्वत्र उत्साहांत साजरी केला जातो.विखुरलेला परिवाराला एकत्र आणने हे या उत्सवाचे वैशिष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात रानमाळ, शहादा तालुक्यातील प्रकाशा व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या गावात कानबाईचे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. एका दिवसाच्या कानबाई मातेच्या सण, उत्सव सर्व परिवार एकत्रित येवुन मोठ्या जल्लोषात साजरा करुण पार पाडला जातो. खान्देशची ग्रामदेवता म्हणुन ख्व्याती असलेल्या कानबाई मातेच्या श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतरच्या पहिला रविवारी कानबाई मातेच्या एक दिवशीय स्थापना करुण उत्सव खान्देशात सर्वत्र उत्सवाने साजरा केला जातो. पुर्वी खानाचं राज्य होतं. खान्देश परिसराचा राजा खान ह्याना पुत्र प्राप्ति नसल्याने खान्देश प्रजेने नवस मानला. राजा खान याना कन्या रत्न प्राप्त झाले.  त्यावेळी जनतेने "खानबाई' उत्सव साजरा केला. खानभाई उत्सवाला खान्देशात कालांतराने या उत्सवाला अप्रभ्रुष होवुन कानबाई म्हणुन ओळखले जाऊ लागले. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हां खान्देश- कान्हादेश-खान्देशी लोक कान्हा म्हणजे भगवान कृष्णाला मानतात. म्हणुन त्यानी देवीचा उत्सव साजरी सुरु करण्यासाठी कानबाई हे नाव घेतले. असावे अशी समज आहे. कानबाई हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, या समाजात साजरा होतो. मात्र आता प्रतेक समाजात कानबाई मातेची स्थापना भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात. कानबाईच्या आगमनापुर्वी घराला घराला रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. परिसर घर। स्वच्छ करुण घरात गोमुत्र शिंपड्तात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते.
चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य असते. कानबाईच्या सजावटीत साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. 'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे.
गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता दोंडायचा जवळ असलेल्या खेड्यात नारळ परनले जाते. तर चाळीस गावा जवळ खेड गावात देखील कानबाई परनन्याचे
कार्य केले जाते. कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात. तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते
. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान
असतो. मनोरंजन म्हणून मोठ्या प्रमाणात सट्टा व पत्त्याचा खेळ पुरुष मंडळी रात्रभर खेळत असते.तर स्त्रिया रात्री जागरण करुण फुगड्या, गरबे, व विविध पारंपारीक नृत्य करतात तसेच कानबाई मातेचे गाणी म्हटली जातात. काही परिवारात फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. शातच एखाद्या कानबाई धरलेल्या
स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही. नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो. दुसर्या दिवशी नि तिसर्या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट
( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे. अहिराणी भाषिक कुटुंबीयांचा हा आवडता सण मानला जातो.
या सणात रोजचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्ती खाऊ शकते. कानुबाईचे विसर्जन दुसर्या दिवशी वाजत- गाजत होते. रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणूनही संबोधले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानुबाईला चौरंगावर बसवून डोक्यांवर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून – नऊवारी साड्या अथवा लुगडि परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो. ‘कानबाई मायनी जतरा दाट. माय..... जतरा दाट हे दर्शन माले, मिये ना वाट. माय.... मिये ना वाट’ अशा प्रकारे भान हरपत, गाणे गात-गात भरल्या अंत:करणाने कानुबाईचे विसर्जन नदीत केले जाते. खान्देशात सर्वत्र कानबाई हां सण जल्लोश्यात साजरी केला जातो. कानबाई हां सण कुटुंब एकत्रिकरणाचे प्रतिक मानला जातो. बाहेर गावी गेलेले कुटुंब या उत्सवाने एकत्रित येतात....