तळोदा- तालुक्यातील प्रती पंढरपुर रांझणी येथे
श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात गेल्या दहा वर्षापासून देवशयनी आषाढी एकादशीला दर्शनासाठी वैष्णवाचा मेळा भरतो यत्रोत्सव साजरा होतो.
तळोदा तालुक्यातील प्रतीपंढ़रपूर रांझणी श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात देवशयनी
एकादशीनिम्मित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच
दिवशी यात्रा भरते जिल्हा परिसरातुन साक्षात पांडुरंगाचा दर्शनासाठी हजारो
भविक हजेरी लावत असतात दिवसभर विठ्ठल नामाचा गजरात वैष्णवांचा
मेळा भरतो सकाळी काकड आरती महापूजा महाआरती होते गावात पांडुरंगाची
पालखी मिरवणुक निघते तसेच प्रतापपुर,चिनोदा, सदगव्हान व् परिसरातील गावातून
पायी पालखी दिंडी येत असतात शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी येतात रांझणी
चारवेदासह शास्र आठरा पूरण मुखोदगत असणारया ब्रम्हचार्य पाळणारया हृषीतुल्य
संतमूनी नंद योगिराज कृष्णानंदजी महाराज यांच्या प्रेरणेतुन रांझणी गावात विविध मंदिर
बांधणीस प्रोत्साहन मिळाले गावात हनुमान,गणपती मंदिर नंतर भव्य दिव्य
श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर कै भटाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र एकादशी
दि 24 एप्रील 1995 मध्ये एका वर्षात श्रमदानाने व जिल्हयातील दानशुर
दात्यांच्या सढळहाताने देणग्याँच्या मदतीने श्री विठ्ठल-रुखमाईचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे
श्री विठ्ठल-रुखमाई विलोभनीय अश्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
मंदिरात संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ व श्री गणेशाची मूर्तीची
प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे रांझणी गावात प्रतीपंढरपुरचे स्थान
निर्माण झाले असुन गोरगरीब भक्तांना येथे पांडूरंगाचे दर्शनाचे सुख प्राप्त करून
देत असतात मंदिर परिसरात पूजा प्रसाद विविध वस्तु खेळणी दुकाने लहान
पालख्या श्रीफळ फुलांची दुकाने थाटली जातात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे
रेलचेल असते दानशूर दात्यांच्या सहकार्याने फराळाची सोय उपलब्ध केली जाते
यामुळे प्रतीपंढरपूर रांझणी म्हणुन नांव लौकिकास आले आहे...
No comments:
Post a Comment