Tuesday, 29 April 2014

तळोद्यातील दिडशे वर्षाचा श्री भवानी मातेचा दशावतारी उत्सव


 तळोदा- स्वातंत्र्यपुर्व काळात समाजातील सर्व स्तरातील लोकांचे एकत्रीकरण व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, नाट्य कथानकातुन समाज प्रबोधन व ज्ञानदान व्हावे,धर्म व संस्कृतीची जाण समाजात जागृत रहावी अशा अनेक उद्दिष्टानी गेल्या दिडशे वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील गांवाच्या मध्यवर्ती असलेल्या बालाजीवाडयातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे मालक वडाळकर कुटुंबीयांनी
पूर्वीपासून गावातील सर्व विविध जातीच्या समाजांच्या सहकार्याने महिषासुर मर्दीनी श्री भवानी मातेचा दशावतारी ललित षटरात्री उत्सव प्रतिवर्षी कार्तिकी एकादशी पासून सहा दिवस पर्यन्त सुरु केला या विठठल मंदिरात पंढरपूर प्रमाणेच एकटया पांडुरंगाचीच काळ्यापाषानाची अत्यंत रेखीव व जाज्वल्य अशी प्राचीन मुर्ती असून ती जागृत असल्याचे मानले जाते त्यासोबत मंदिरात पिनलाच्या विठोबा व राही रुखमाईच्या देखण्या मूर्ति व संगमरम्राच्या गणपती व् पार्वतीमातेच्या मूर्ती आहेत सदरच्या पारंपारिक दशावतारी उत्सवासाठी पूर्वीपासून लाकडात कोरलेले मुखवटे म्हणजे उत्कृष्ट कारागिरिचे उत्तम नमूने आहेत सुमारे 50/60 वर्षापूर्वीपर्यंत रेडिओं, टी.व्हीचा फारसा प्रचार नसल्यामूळ मनोरंजन व करमणुकिबरोबरोच धार्मिक सांस्कृतिक शिक्षण देणा-या हया
उत्सवासाठी जवळच्या पंचक्रोशीतुन लोक अवार्जुन गर्दी करत असत पाच दिवस दररोज धार्मिक कथांवर संगीत नाटकाचा बाज चडवुन स्टेजवर सादर केले जात असत महिना दोन महिन्यापासून संगीतरागदारी पदे व संवाद ह्यांचा सराव पात्रांची निवड साहित्यांची जमवाजमव चालत असे तग्लौघात संगीत पदे व नाट्य संवाद कमी झाले आणी फक्त देव असुर ह्यांची प्रतीकात्मक युद्ध एवढ़ेच भाग राहिला परन्तु तो पहाण्यासाठी सुध्दा खुप मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात ह्या उत्सवात गणपती,शेंदुरासुर, शंखासुर, वराह, नरसिंह, मारुती,त्राटिका, भवानी मातादेवी आणि महिषासुर असे एकुण नऊ लाकडात कोरलेले मुखवटे वापरले जतात सुमारे 150 वर्षापूर्वीच्या करागिरांनी कसब पणा ला लावून तयार केलेले हे सर्वच मुखवटे अत्यंत रेखीव आहेत परंतु त्यातल्या त्यात गणपती नरसिंह ,देवी भवानी माता व महिषासुर हे मुखवटे अतिशय आकर्षक आहेत प्रतिवर्षी कार्तिकी एकाद्शी पासून ह्या उत्सवाला सुरवात होते पहिल्या रात्री 9 ते 10 वा वेळेत गणपती व शेंदुरासुर हे मुखवटे चढवून दोन जण डफडयांच्या तालावर नाच करतात व शेवटी महिषासुराच्या ढालीवर शंखाने आघात करून गणपती त्यांचा वध करतो दस-या रात्री कच्छ (कासव) व मत्स्य (मासा) ह्या विष्णुच्या दोन आवतारांचे सोंग घेउन शंखासुराचा वध केला जातो तीस-या रात्री वराह अवतार व हिरण्यकक्षप राक्षसाचा वध होतो चवथ्या रात्री पहाटे साडे पांच ते सहा वाजेला
नरसिंह अवतार व हिरण्यकक्षप राजा ह्याचे युध्द व राक्षसराजा हिरण्यकक्षप वध आणि त्याच दिवशी रात्री श्रीराम लक्ष्मण व हनुमान अवतार व् त्राटिका वध असा कार्यक्रम होते ह्या उत्सवालातील सर्वात महत्वाचा व सर्व गावक-यांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे सहाव्या दिवशी निघनारी भवानी मातेची शोभायात्रा ह्या दिवशी पहाटे पाच वाजेपासून संपूर्ण दिवस आणि रात्री 11वाजेपर्यंत गावातून घरोघरी मातेची आरती व पूजा केली जाते ठिकठिकाणी भवानी मातेची व् महिषासुराची टक्कर होते व शेवटी बालाजी वाड्यात मातेची व् दैत्यराज महिषासुरंचे युध्द व् टक्कर होउन महिषासुरचा वध होतो, ह्यावेळी भवानी मातेचे रूप परिधान करणारे निरंकार उपवास करुण दिवसभर ठीक ठिकाणी टक्कर घेत असतात. अशाप्रकारे प्रदीर्घ काळापासून चालत आलेला हा उत्सव म्हणजे तळोदे शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा एक सास्कृतिक कार्यक्रम असून बालाजी वाड्यातील श्री विठ्ठल मंदिराचे पुजारी व् मालक वडाळकर कुटुंबियांनी मागील पाच ते सात पिढ्या पासून ह्या कार्यक्रमाचे संयोजन गावातील अनेक लोकांच्या स्वेच्छा सहकार्याने चालु ठेवले आहे ते तसेच चालु राहावे व तळोदे गावाचे हे एक महत्वाचे वैशिष्टे टिकून रहावे यासाठी वडाळकर कुटूबींय गावातील नागरिक प्रयत्नशील आहेत....

Saturday, 26 April 2014

सातपुडा परीसरात महू फुलांचे झाडे

. फुलली सातपुडा परीसरात महू 



तळोदा- तालुक्यातील सातपुडयाच्या सर्वत्र रांगेत व पायथ्यालगत असलेल्या परिसरात मार्च व एप्रिल महिन्यात महू फुलांनी बहरली आहेत त्यामुळे महू फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे तसेच महू फुलांचा वेचणीतुन आदिवासी बाधवांना रोजगार उपलब्ध होत आहे तळोदा तालुका सातपुडयाच्या पर्वत रांगेच्या पायथ्यालगत आहे सातपुडा

परीसरात महू फुलांचे हजारो झाडे आहेत तसेच कही शेतक-यांच्याशेतातील बांधावर व खाजगी जागेत महू फुलांचे झाडे आहेत उन्हाळा सुरु झाल्याने पानगळ होउनी महू फुलांच्या झाडांना बहर येवू लागतो संपूर्ण सातपुडा परीसर महू फुलांनी बहरून गेला आहे या फुलांचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठीच होतो असे नाही तर महु फुलांचे आयुर्वेदात मोठे महत्व आहे महू फुलांचा भाजीसह खाद्यपदार्थ तसेच आजरांवर उपचारा साठी औषध म्हणून उपयोगात येतात आजारपणात तोंडाला चव यावी म्हणून उसळ खातात खोकला, पोटदुखी, बळन्त, आजरावर महू फुले गुणकारी आहेत, भाकरीच्या पिठात सुकलेली महू फुले टाकुन खालल्यास शांत झोप येते या महू फुलांच्या सेवनाने खोकलाही नष्ट होतो एप्रिल महिना सुरु आसल्याने तापमानाने चालीसी ओलांडली आहे सातपुडा परिसरात रात्री बारा वाजेंनंतर बोचरी व गुलाबी थंडी जाणवते या थंडीला मोहडी थंडी म्हणुन संबोधले जाते या मोहडी थंडीत पहाटे पक्कव जहालेले महू फुलांची गळण होते सकाळी सर्वत्रा आदिवासी बांधव महू फुलांची वेचणी करतांना दिसून येते आहे या महू फुलांचा वेचणी तुन अनेकांना रोजगार मिळाला आहे....


Sunday, 20 April 2014

बुधावल येथील श्री गणेश मंदिर

तळोदा तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणुन सर्वदुर ख्व्याती असलेले बुधावल येथील श्री गणेश मंदिर भाविकांचे श्रध्दा स्थान आहे या गणेशाच्या मंदिरामुळे या गावाला गणेश बुधावल म्हणु न प्रसीद्धी मिळाली आहे या मंदिराचा तब्बल 250 वर्षाचा इतिहास् आहे. गणेश उत्सवा निमित्त येथे भाविकांची गर्दी उसाळत असते. तळोदा राजवीहीर रस्त्या वर तळोदा शहरा पासून सुमारे चार किलो मीटर अंतरावर असलेले बुधावल गाव तेथील प्राचीन गणेश मंदिर विशेष प्रसिद्ध आहे या मंदिराच्या परिसरात असलेली प्राचीन विहीर मंदिराचा इतिहास 200 वर्षा पुर्वी पेक्षाही जास्त असल्याची साक्ष देते येथे कमानी असलेली प्राचीन पाय विहीर आहे या विहिरिला लागुनच गणेशाचे मंदिर होते परंतु या मंदिराचा भींतिची धुप झाल्याने मंदिर पडण्याच्या मार्गावर होते त्यामुले येथील भाविकांनी 1960-61 मध्ये हे प्राचीन मंदिर पाडले त्या नंतर 1961 मध्ये छोटेसे मंदिर बांधण्यात आले याच मंदिराच्या अवती भोवती 1986-87 मध्ये पत्र्याचे शेड उभारण्यात आले 2007 मध्ये सिमेंट कांक्रीट चे मंदिर बांधण्याच्या निर्णय घेण्यात आला व भाविकांनी दिलेल्या देणगीतुन या मंदिराच्या उभारनिचे काम सुरु असल्याचे येथील कामकाज पाहणारयां भाविक सांगितात पूर्वमुखी मंदिरातील गणेशाची मूर्ति सुंदर रेखीव व आकर्षक असून एकाच कला पाशानातील आहे या मूर्तीला चढ़वन्यात आलेल्या सेंदुरामुळे तिचे तेज अधिकच खुलुन दिसते . या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी लांबचे भाविक या ठिकाणी येतात. श्रावण महिन्यात सत्यनारायनाची महापूजा तसेच चतुर्थिला येथे भाविकांची गर्दी होते. परिसरात असलेले वडा चे झाड भाविकांना शीतल छाया देण्यात व लीन होण्यास मदत करते. मंदिर परिसरात 1963 पासून गुढीपाढव्याला मोठी यात्रा ही भरते. या मंदिराचे बांधकाम व परिसरातील कामे भाविकांनी दिलेल्या देणगीतूंनच पूर्ण केले जात असल्याचे सागण्यात आले . येथे येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी खुर्च्या वेलदा येथील पटेल कुटुंबीय व तलोदा येथील जगन्नाथ एकनाथ माळी यानी बसविल्या आहेत. तसेच मंदिराचे बांध काम अजुनही अपूर्ण अवस्थेत असल्याने भाविक व देंणगी दारानी अधीकाधीक देणगी द्यावी , अशी अपेक्षा येथील देखरेख करनारे भाविक व्यक्त करतात. पर्यटनाच्या दृष्टीनेही येथील मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटन विभागाकडूनही येथील मंदिर विकासाकडे लक्ष देण्याची अपेक्षा भाविकानी व्यक्त केलि आहे. या मंदिर परिसरात असलेली प्राचीन विहीर जुन्या बांधकाम शैलिची आठवण करुण देणारी आहे. या विहिरीत उतरन्या करीता पायवाट असून पायर्यावर तीन ठिकाणी तीन व दोन व एक अश्या कमानी आहेत. याच विहिरिचे पाणी पिउन 1971-72 व 1984-85 च्या दुषकाळी काळात परिसरातील जनतेचे हाल थांबले होते. या विहिरीत आजही पाणी असल्याने श्री गणेशा मुलेच पाणी टिकून असल्याची भावना परिसरातील नागरिकांची आहे.या प्राचीन गणेशाच्या मंदिराची देखरेख कोमा नेहरु वळवी यांच्या कुटुंबाकडे आहे. येथील धार्मिक विधी ते पार पाडतात तसेच येथील भाविक सूर्या केमन्या पाडवी, विजय वेजू वळवी, शिवाजी वेरत्या वसावे, मनोज श्रीराम कर्नकार, जीवन दत्तु पवार, सुनील गोपाळ पाटिल यांच्या सह कार्याने सुख सोयी पुरविल्या जातात. आजपर्यंत भाविकानी दिलेल्या देणगीतुनच मंदिराची उभारनी होत आली आहे. परंतू अपूर्ण अवस्थेतील काम पूर्ण होण्यासाठी देनगीदार व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोमा वळव़ी यानी केले आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा, अशी ख्व्याती असलेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया' च्या जय घोषाने येथील परिसरात चैतन्य पसरलेले असते.

 स्वातंत्र्य संग्रामात तळोदेकरांचा सहभाग

ब्रितिश सत्तेविरुध 1857 पासून सुरु झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाने खर्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्यासाठी झटण्याची प्रेरणा दिली. ती प्रेरणा घेउन भारतीय तरुण ब्रिटिश सत्ते विरुद्ध आवाज बुलंद लागले, सुरुवातीला लोकमान्य टीळकाच्या वेळे पासूनच ब्रिटिश सत्ते विरुद्धचा असंतोष येथील जनतेत खद्खद्त होता येथील युवकांनी 1928 पासून देश्भाक्तिच्या विविध कार्यक्रमात शामिल होऊंन तो दाखून दिला.चहाचा बहिष्कार,परदेशी कापडाची,
होळी दारुबंदी, खादिचा वापर , प्रभात फेरी,गणेशउत्सवातील मेळावे, नाट्यप्रयोग आदि मार्गानी येथील जनता देश प्रेम व्यक्त करत होती. त्यात धरमदास भाट, चोटाभई पटेल, भिक्कन पटेल, उखा तुकाराम आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 1942 मध्ये तलोदा तालुक्यातील अनेक तरुण या स्वातंत्र्य चळवळी कड़े आपसुकच ओढले गेले. प्रभात फेरी झेंडा वंदन, स्वदेशिचा प्रसार, दारुबंदिचा प्रचार आदि कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडत होते.प्रत्येक जण देशभक्तिने प्रेरित होउन, चळवळीत सामिल होत होता. त्यात नथूसिंह परदेशी ,देवराम कुकावलकर, भगवान शेंडे ,कन्हेंया वाणी, डॉ मनोहर वडाळकर, रामदास शंकपाळ, दामोदर शाह यासारखी मात्तबर मंडली व् अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. कांग्रेस अधिवेशनाना उपस्थित राहणे महात्मा गाँधीच्या सभा ऐकावयास जाने तेथून पत्रके आनने व ती वाटणे अशी कामे ही होत होती. काही कार्यकर्ते भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीत मदत करत होते पत्रके वाटने निरोप सांगायला जाने आदि कामे होत होती. भूमिगत कार्य करनार्याँन मध्ये गोरख हुलाजी महाजन, छगन तंबोली, भगवंत बैकर, गुलाबसिंह परदेशी, सुपडु बनकर, दगडुसा कलाल, आदि कार्यकरत्यांचा समावेश होता. प्रत्यक्ष मदत करनार्यान मध्ये काशी नाथ भाट, बबन चौधरी, रामदास गुजराथी, चंदू वना, सुपडु बनकर, पी एस वाणी, एस बी शिंपी, गिम्बा पाडवी, छोटुभाई वाणी, मदन पाटिल, गिरधर लोहार, लक्ष्मन पाटिल,
इंदास पाटिल, शंकर कलाल, तुकाराम कलाल, तेजिबाई तंबोळी, आदि कार्यकर्त्यांचा समावेश होता. सामाजिक सुधारन्याच्या
दिशेने आदिवासी समाजात जागृति घडविन्याचे काम मोरवड चे गुलाम महाराज करित होते. दारू पीऊ नये खोटे बोलू नये स्वच्छ ता राखणे मांस खाऊ नये एकमेकांचा आदर राखने आदि उपदेश त्यानी समाजाला केले तसेच पश्चिम खान्देश भिल्ल मंडळाची स्थापना झाल्या नंतर या मंडळा कडून देखील दारू बंदी शिक्षणाचा प्रसार आदि कार्यातुन मदत होत होती. 9 सप्टेम्बर 1942 रोजी नंदुरबार येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकिवर बेछट गोळीबार केल्याच्या निषेधार्थ तालुक्यात कडकडीत बंद पाळन्यात आला. शिरिशकुमार व त्याचे साथीदार या गोळी बारात शहीद झाले होते. 1944 च्या 21ऑगस्टला तळोद्यात पीपल्स एजुकेशन सोसाइटी ची स्थापना करण्यात आली. त्या वेळी नगर पालीकेकड़े असणारे शेठ के डी हायस्कूल चालवन्यासाठी घेतले व् तालुक्यात शिक्षणीक विकासाची मुहुर्तमेढ़ रोवली गेली. तलोद्यात हल्ली जेथे आनंद मेडिकल चौक आहे त्या चौकात गोलाकार ओटा व मध्यभागी एक स्तंभ होता . या जागेला रास खाब म्हणत असत स्वातंत्र्य संग्रामा च्या काळात सर्व राजकीय सभा सत्याग्रह याच ठिकाणी होत असत. अनेक कार्यकरत्यानी या स्तभावर झेंडा फड़कवून व् भाषणे करूण स्वतः ला अटक करून घेतली होती. त्याच बरोबर गिल्डर चौक कनकेश्वर मंदिर बलभीम व्यायाम शाला बालाजी वाडा विशालाल पंचवाडी ही ठिकाणे कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्य संग्रमाची मूक साक्षीदार होती. त्यात या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नानासाहेब ठक्कर, साने गुरूजी, भाऊ साहेब रानडे, शंकर पांडू माळी, एस ऍम जोशी, डॉ मिरजे, व्यकट आन्ना रणधीर, यांचे वास्तव्य राहिले होते.

तलोदा तालुक्यातील प्रती पंढरपुर रांझणी

तळोदा- तालुक्यातील प्रती पंढरपुर रांझणी येथे श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात गेल्या दहा वर्षापासून देवशयनी आषाढी एकादशीला दर्शनासाठी वैष्णवाचा मेळा भरतो यत्रोत्सव साजरा होतो. तळोदा तालुक्यातील प्रतीपंढ़रपूर रांझणी श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात देवशयनी एकादशीनिम्मित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याच दिवशी यात्रा भरते जिल्हा परिसरातुन साक्षात पांडुरंगाचा दर्शनासाठी हजारो भविक हजेरी लावत असतात दिवसभर विठ्ठल नामाचा गजरात वैष्णवांचा मेळा भरतो सकाळी काकड आरती महापूजा महाआरती होते गावात पांडुरंगाची पालखी मिरवणुक निघते तसेच प्रतापपुर,चिनोदा, सदगव्हान व् परिसरातील गावातून पायी पालखी दिंडी येत असतात शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी येतात रांझणी चारवेदासह शास्र आठरा पूरण मुखोदगत असणारया ब्रम्हचार्य पाळणारया हृषीतुल्य संतमूनी नंद योगिराज कृष्णानंदजी महाराज यांच्या प्रेरणेतुन रांझणी गावात विविध मंदिर बांधणीस प्रोत्साहन मिळाले गावात हनुमान,गणपती मंदिर नंतर भव्य दिव्य श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर कै भटाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र एकादशी दि 24 एप्रील 1995 मध्ये एका वर्षात श्रमदानाने व जिल्हयातील दानशुर दात्यांच्या सढळहाताने देणग्याँच्या मदतीने श्री विठ्ठल-रुखमाईचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे श्री विठ्ठल-रुखमाई विलोभनीय अश्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिरात संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ व श्री गणेशाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे रांझणी गावात प्रतीपंढरपुरचे स्थान निर्माण झाले असुन गोरगरीब भक्तांना येथे पांडूरंगाचे दर्शनाचे सुख प्राप्त करून देत असतात मंदिर परिसरात पूजा प्रसाद विविध वस्तु खेळणी दुकाने लहान पालख्या श्रीफळ फुलांची दुकाने थाटली जातात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल असते दानशूर दात्यांच्या सहकार्याने फराळाची सोय उपलब्ध केली जाते यामुळे प्रतीपंढरपूर रांझणी म्हणुन नांव लौकिकास आले आहे...

Thursday, 17 April 2014

गणेश आरास स्पर्धा

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवंगत पत्रकार स्व.प्रा.मगनलाल माळी व स्व.महेंद्रकुमार परमार  यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणेश आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  पत्रकार संघा तर्फे 26 oct 2013 घेण्यात आलेल्या हां प्रथम कार्यक्रम.... असे म्हटले जाते की कोणत्याही शुभ व चांगल्या सार्वजनिक कार्याची  सुरवात करत असताना प्रथम गणेशजीचे पुजन करणे लाभाचे व यशाचे ठरते. म्हणून तलोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे देखील प्रथम जयघोष हां गणेशजींचा आरधनेचा व पुजेचा कार्यक्रम घेउन करण्यात आला  त्याला तलोदेकर जनतेने व गणेश भक्तांनी तेवढाच उत्तम प्रतिसाद दिला.  शहरातील प्रतेक गणेश मंडळाला तज्ञ परीक्षक व कला शिक्षकांनी  भेटी देवुन तेथील मंडळाना, पत्रकार संघाचा माध्यमातून  टाप टिप पना मांडणी सामाजिक संदेश, प्रभोदन, धर्मनिरपेक्षता सामजिक एक्य कसरती तालीम मानवीय मनोरे वाजंत्री आरास, परिसर, स्वच्छता, निटनेटकेपणा, अश्या गोष्टींचे निरिक्षण केले,  तसेच गणेश विसर्जनाचा दिवसी वाजंत्री,शिस्त,

                  

अश्या सर्वच गोष्टींचा पृथक असा अभ्यास करुण, योग्य त्या मंडळाला विजयी ढाल व रोख रक्कम देण्यात आले.ह्या कार्यक्रमाला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हे कार्यक्रमाचा 
अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून न.पा.बांधकाम सभापती संजय माळी, व गावातील सर्वच पक्षातील मान्यवर उपस्थित होते. त्यात मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दूबे, भाजप शहराध्यक्ष अनुप उदासी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुभाष कलाल, जिल्हा उपाध्यक्ष मनसे पृथ्वीराज राजूपत,
शहर अध्यक्ष सुरज माळी,सामाजिक कार्यकर्ते उध्दव पिंपळे, हसमुख पटेल,
संदीप वळवी, ऍड.संजय पुराणीक,प्रा.सुधीर माळी, किसन कलाल,तथा तळोदा पोलिस ठाण्यातील पोलीस निरिक्षक श्री.विजय जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शहरातील सर्वोत्तंम आरास बनवीनारा दादा गणेश मंडळास प्रथम तर बडादादा गणेश मंडळास व्दितीय क्रमांक तर क्षत्रिय माळी समाज नवयुवक मंडळास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.तर उत्तेजनार्थ सुवर्णकार गणेश मंडळ,व सर्वोदय गणेश मंडळ जोहरी नवयुवक गणेश मंडळाला देण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फुदींलाल माळी सरानी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास मगरे यांनी केले.व आभार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.सुनील सुर्यवंशी(कालु) ह्यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर मराठे
श्री.विकासदिप राणे, चेतन इंगळे, महेंद्र लोहार गणेश
देसले, किरण पाटील, ईश्वर मराठे, प्रविण भारती आदींनी परिश्रम घेतले. तज्ञ परीक्षक व कला शिक्षक तथा टाप टिप पना मांडणी सामाजिक संदेश व प्रभोदन, धर्मनिरपेक्षता सामजिक एक्य कसरती तालीम मानवीय मनोरे वाजंत्री शिक्षकांनी मंडळाचा पत्रकार संघाचा माध्यमातून अश्या बाबींचे निरिक्षण करुण गुंदान केले

Tuesday, 15 April 2014

जयंती

@ हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा @



Monday, 14 April 2014

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

@  डॉ. बाबासाहेब आंबेडकर @


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन... 
 व तमाम बहुजन जनतेस शुभेच्छा..... 
भारत रत्न डाँ. बाबासाहेब आबेडकर यांची शैक्षणिक पात्रता ( 1891-1956) 
 B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D., D.Litt., 
 Barrister-at-La w. B.A.(Bombay University) Bachelor of Arts, 
MA.(Columbia university) Master Of Arts, M.Sc.
( London School of Economics) Master Of Science, 
Ph.D. (Columbia University) Doctor of philosophy , 
 D.Sc.( London School of Economics) Doctor of Science , 
L.L.D.(Columbia University) Doctor of Laws , 
 D.Litt.( Osmania University) Doctor of Literature, 
 Barrister-at-La w (Gray's Inn, London) 
law qualification for a lawyer in royal court of England. Elementary Education, 
1902 Satara, Maharashtra Matriculation, 1907, 
Elphinstone High School, Bombay Persian etc., 
 Inter 1909,Elphinston e College,Bombay Persian and English B.A, 
 1912 Jan, Elphinstone College, Bombay, University of Bombay, 
Economics & Political Science M.A 2-6-1915 Faculty of Political Science,  Columbia University, 
New York, Main- Economics Ancillaries-Soc iology, History Philosophy, Anthropology, 
Politics Ph.D 1917 Faculty of Political Science, Columbia University, 
New York, 'The National Divident of India - A Historical and Analytical Study' M.Sc 1921 June London School of Economics, London 'Provincial Decentralizatio n of Imperial Finance in British India' Barrister-at- Law 30-9-1920 Gray's Inn, London Law D.Sc 1923 Nov London School of Economics, London 'The Problem of the Rupee - Its origin and its solution' was accepted for the degree of D.Sc. (Economics). L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York For HIS achievements, Leadership and authoring the constitution of India D.Litt (Honoris Causa) 12-1-1953 Osmania University, 
 Hyderabad For HIS achievements, Leadership and writing the constitution of India!
 बाबासाहेबांच्या जयंती निमित्त्य आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा......

श्रीरामनवमी

 श्रीरामनवमी

तिथी : चैत्र शुद्ध नवमी इतिहास : 
श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ 
श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, 
माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला. 
 महत्त्व :  देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त 
प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० 
पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप, 
तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ 
मिळण्यास मदत होते. उत्सव साजरा करण्याची पद्धत : `
कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. 
रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, 
अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. 
माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) 
घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व 
भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी 
श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. - संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (
रामजन्माचे गीत) म्हटला जातो.' त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात 
व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. 
या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, 
तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.