Wednesday, 10 August 2016

तळोदा पत्रकार संघाची जिल्हा प्रशासन कडून दखल

*तळोदा पत्रकार संघाची जिल्हा प्रशासन कडून दखल* 
तळोदा तालुका व परिसर सातपुड्यात घाट प्रेक्षणीय पर्यटन ठिकाणी संरक्षक कठड़ेसुचना फलक लावणे तसेच सुरक्षा रक्षक नेमनेबाबत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे निवेदन दिले होते जिल्हाधिकारी यांनी संबधित सर्व विभागांना सुचना दिलेल्या आहेत अशी माहिती तळोदा विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिजीत राउत यांनी पत्रकार संघाला एका पत्रकान्वे दिली आहे तळोदा तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे सर्व विभागाला बिलगांव दुर्दैवी घटने बाबत तसेच गेल्या वर्षी वाल्हेरी धबधब्यात तळोद्यातिल दोन युवक बुडुन मरण पावले होते या घटनेच्या पार्श्वभूमि वर निवेद न सादर करयात आले होते या संदर्भात निवेदना वर कार्यवाही करण्यात आली व सर्व आठरा विभागांना सुचना करण्यात आल्या त्यात अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ विभाग धुळे/नंदुरबार, कार्यकारी अभियंता म प्र धुळे पाटबंधारे विभाग क्र १ , कार्यकारी अभियंता मध्यम प्र नं दुरबार पटबंधरे विभाग नं दुरबार क्र २ , कार्यकारी अभियंता नर्मदा विकास विभाग नंदुरबार, कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग जि प नं दुरबार, कार्यकारी अभियंता लघु सिंचन विभाग जि प नं दुरबार, कार्यकारी अभियंता स्थानिक स्तर जि प नं दुरबार, कार्यकारी अभियंता म रा वि वि कं लि श हदा नं दुरबार, सर्व तहसीलदार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नं दुरबार, उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग तळोदा, उपवनसंरक्षक नं दुरबार, वनविभाग श हादा, उपवनसंरक्षक उत्तर धुळे वि श हादा, जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नं दुरबार, सर्व गट विकास अधिकारी पं स, सर्व मुख्याधिकारी न पा, शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक जि प नं दुरबार, यांना सुचना केल्या आहेत् गंभीर धोक्याच्या ठिकाणी वावर असणारे/जाणारे लोकांना आवश्यक खबरदारी काळजी घेतल्यामुळे होणारी जीवित वित्त हानि ट ळू शकते या पार्श्वभूमीवर कळ विन्यात आले आहे जिल्ह्यात असे धोकेदायक ठिकाणे जीवित वित्त हानि होऊ शकते अश्या जागां निश्चिती करून त्या ठीकाणावर खबरदारीची उपाययोजना म्हणून माहिती फलक सुचना फलक लावणे आवश्यक आहे जेने करुन अश्या ठिकाणी माहिती सुचना फलकांमुळे लोकांना खबरदारी घेता येईल व होणारी वित्त हानि जीवित हानि टाळता येईल सातपुड्यातील निसर्ग सौदर्य तरुनाई ला
वेड लावणार असून तळोदा अक्कलकुवा धडगांव तालुक्यातील अनेक दुर्गम स्थळ आहेत जिल्ह्यात एक दिवसाचा विरंगुळा चे ठिकाण कुठेच तोरणमाळ सोडल्यास दिसून येत नाही त्यामुळं पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वतराजीत कोसळणाऱ्या पावसामुळं ठीक ठिकणी छोटे मोठे धबधबाचा ठिकाणी उत्साही तरुण दरवर्षी जात असतात मात्र या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित झालेलं नाही या पैकी वाल्हेरी हे ठिकाण विकसित होण्याकरिता निधी मंजूर असून अजून कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळं सातपुड्यातील या सारख्या अनेक दुर्गम स्थळी रस्ते ,वीज, व कोणतेही सुरक्षेचा दृष्टीकोनातून कोणतेही सूचना फलक नाही त्यामुळं नेमक धबधबा कुठं किती खोल आहे याचा अंदाज येत नाही उत्साही तरुण मात्र या पैकी कोणतेही माहिती स्थानिक नागिरक कडून न घेता तारुण्याचा उत्साहात धोकेदायक जागेवर वावरताना दिसतात यामुळ  निदान
 पावसाळ्यात तरी इथं मानधनावर स्थनिक माहितगार सुरक्षा रक्षक ठेवावा अशी मागणी होत आहे या बाबत एकूणच याची गंभीर दखल तळोदा तालुका पत्रकार संघा ने घेतली असून या बाबत निवेदन देणार असल्याच समजत *हि आहेत पावसाळ्यातील प्रेक्षणीय व धोकेदायक स्थळ* तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ १७ कि,मी,अंतरावर असून या ठिकाणी दोन धबधबे आहेत या ठिकाणी जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून तरुण पर्यटक येत असतात समाधान कारक पाऊस झाल्यास हे पाणी अकोटोंबर चा मध्यपावेतो टिकून असते या ठिकाणी देखील अनेकांचे जीव गेले आहेत मागील वर्षी तळोदा शहरातील दोन तरुण व्यापारी आपल्या इतर मित्रा सोबत वनभोजनासाठी गेले होते मात्र या ठिकाणी त्यांचा बुडल्याने दुर्देवी अंत झाला होता या अगोदर देखील ४ते ५ तरुनाचा जीव या ठिकाणी गेला आहे *धडगांव तालुक्यातील बिलगाव येथील बारा मुखी धबधबा* धडगांव तालुक्यातील बिलगावं हे गाव दुर्गम भागात असून धडगांव पासून जवळच आहे या ठिकाणी देखील दरवर्षी तळोदा शहादा तालुक्यातील तरुण पावसाळी पर्यटन म्हणून जात असतात यंदा देखील असेच तळोद्यातील सात तरुण फिरण्यासाठी आले असता दोन स्कखे भाऊ चा यात दुर्देवी अंत झाला. अश्या घटनांची पुनावृत्ती टाळ्यायची असल्यास आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे .

Monday, 18 July 2016

तलोदा तालुका मराठी पत्रकार संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर

*तलोदा तालुका मराठी पत्रकार संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर* 🔴
अध्यक्षपदी ईश्वर मराठे 🔵
उपाध्यक्ष भरत भामरे 🔴
सचिव उल्हास मगरे 🔴
कोष्याध्यक्ष पदी किरण पाटील
तलोदा तालुका मराठी पत्रकार संघांची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा तलोदा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली .या सभेत नवीन कार्यकारिणी निवड करण्याचा विषय चर्चेत आला त्यावेळी जूनी कार्यकारिनीतिल सर्व पदाधिकारी यांनी लोकशाही पद्धतीने राजीनामे सादर करुन पत्रकार संघातील एकजुटीचे प्रदर्शन केले व नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडण्यात आली.त्यात अध्यक्षपदी ईश्वर मराठे ,उपाध्यक्ष भरत भामरे ,सचिव उल्हास मगरे व कोषाध्यक्ष किरण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ।मावळते अध्यक्ष कालीचरण सूर्यवँशी यांनी मागील तीन वर्षाच्या कामाचा अहवाल मांडला व मराठी पत्रकार संघान्च्या लोकाभिमुख व जनजागृतिपर कार्यक्रमांची उजळनी करुन नवीन कार्यक्रमांची अजुन पेरणी कशी करता येईल याची चर्चा केली . यावेळी माजी प्राचार्य ए टी वाघ सर यांनी पत्रकार संघाची उज्वल परंपरा व लोकशाही लोकाभिमुख कार्यक्रमांची प्रशंसा केली व नवीन कार्यक्रम कोणते करता येतील यावर मार्गदर्शन केले. यावेळी मावळते अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी ,जिल्हा सहसचिव विकासदीप राणे ,माजी प्राचार्य ए टी वाघ ,नूतन अध्यक्ष ईश्वर मराठे ,उपाध्यक्ष भरत भामरे, सचिव उल्हास मगरे, कोषाध्यक्ष किरण पाटील ,सुधाकर मराठे,मंगेश पाटील ,फुंदीलाल माळी ,सम्राट महाजन ,चेतन इंगळे,प्रविण भारती ,महेंद्र लोहार , प्रा बन्सिलाल भामरे ,राकेश गुरव आदि उपस्थित होते 🖊*तलोदा तालुका मराठी पत्रकार संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर* 🔴अध्यक्षपदी ईश्वर मराठे 🔵उपाध्यक्ष भरत भामरे 🔴सचिव उल्हास मगरे 🔴कोष्याध्यक्ष पदी किरण पाटील तलोदा तालुका मराठी पत्रकार🖊 संघांची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा तलोदा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली .या सभेत नवीन कार्यकारिणी निवड करण्याचा विषय चर्चेत आला त्यावेळी जूनी कार्यकारिनीतिल सर्व पदाधिकारी यांनी लोकशाही पद्धतीने राजीनामे सादर करुन पत्रकार संघातील एकजुटीचे प्रदर्शन केले व नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडण्यात आली.त्यात अध्यक्षपदी ईश्वर मराठे ,उपाध्यक्ष भरत भामरे ,सचिव उल्हास मगरे व कोषाध्यक्ष किरण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ।मावळते अध्यक्ष कालीचरण सूर्यवँशी यांनी मागील तीन वर्षाच्या कामाचा अहवाल मांडला व मराठी पत्रकार संघान्च्या लोकाभिमुख व जनजागृतिपर कार्यक्रमांची उजळनी करुन नवीन कार्यक्रमांची अजुन पेरणी कशी करता येईल याची चर्चा केली . यावेळी माजी प्राचार्य ए टी वाघ सर यांनी पत्रकार संघाची उज्वल परंपरा व लोकशाही लोकाभिमुख कार्यक्रमांची प्रशंसा केली व नवीन कार्यक्रम कोणते करता येतील यावर मार्गदर्शन केले. यावेळी मावळते अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी ,जिल्हा सहसचिव विकासदीप राणे ,माजी प्राचार्य ए टी वाघ ,नूतन अध्यक्ष ईश्वर मराठे ,उपाध्यक्ष भरत भामरे, सचिव उल्हास मगरे, कोषाध्यक्ष किरण पाटील ,सुधाकर मराठे,मंगेश पाटील ,फुंदीलाल माळी ,सम्राट महाजन ,चेतन इंगळे,प्रविण भारती ,महेंद्र लोहार , प्रा बन्सिलाल भामरे ,राकेश गुरव आदि उपस्थित होते 🖊



Tuesday, 28 June 2016

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

तळोदा राष्ट्रीय एकात्मता बंधु भाव सामाजिक सलोखा राखण्यात प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे समाज सलोख्यासाठीची पत्रकारांची भूमिका कौतुकास्पद असून मराठी पत्रकार संघाचा या उपक्रमातुन दिसून आले आहे असा सुर उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर,हिन्दू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमास आ उदेसिंग पाडवी, जि प उपाध्यक्ष सुहास नाईक , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, तहसीदार रामचंद्र पवार, पोलिस उप अधीक्षक गृह राजेंद्र रायसिंग,पं स उपसभापती दीपक मोरे, नायब तहसीलदार रिनेश गावीत, मौलाना शोएब रजा नूरी, मौलाना जुनेद हाफिज, पं स माजी सभापती आकाश वळवी, नगरसेवक संजय माळी, हाजी, नगरसेवक गौरव वाणी, निसारभाई मकरानी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे , अकबर शेख, अकील अंसारी, अॅड महबूब शेख, अक्रम पिंजारी, पोलिस निरीक्षक संजय भामरे, उध्दव पिंपळे, रईसअली अब्बास अली, अनिल माळी, माजी प्राचार्य अशोक वाघ, प्राचार्य सी एच राजकुळे, मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, माजी नगरसेवक इम्तेयाज कुरेशी, भैय्या सरदार , सुलतान गनी, इम्तेयाज कुरैशी, शब्बीर पिंजारी अदि व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी, जि प उपाध्यक्ष सुहास नाईक, मौलाना शोएब रजा नूरी, मौलाना जुनेद हाफिज , पोलिस उपअधीक्षक गृह राजेंद्र रायसिंग, हाजी निसारदादा मक्राणी, आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की; इफ्तार पार्टी मुळे जातीया सलोखा जपन्यास मदत होते बंधुभाव भाईचारा अधिक वृंदिगत होतो तसेच तळोदा शहरात पूर्वीपासून असलेल्या या दोन्ही पंथियांचे एकीचा संबंधाचे दाखले दिलेत. हिन्दु - मुस्लिम या दोन्ही पंथियांनी गुण्या गोविंदयाने रहात, शहराची शांतता कशी टिकून राहील या बददल ही मार्गदर्शन केले. तसेच मराठी तालुका पत्रकार संघाने असे प्रभोधणात्मक कार्य पुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा सर्वांनी आपल्या मनोगनत व्यक्त केली. यावेळी मुस्लिम समाजातील लहान बालकांचा संपूर्ण एक महीना रोजे केलेल्या बालकांचा प्रमुख अथितींचा हस्ते सत्कार करुन त्यांना गिफ्ट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शेवटी सर्वांना वडे, खजूर व शरबत देण्यात आले, मुस्लिम बांधवांनी फराळ खाऊन आपला उपवास सोडले कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी यांनी केले तर सूत्र संचालन फुंदीलाल माळी यांनी आणि आभार संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष मंगेश पाटील, सचिव उल्हास मगरे, अशोक वाघ, भरत भामरे, ईश्वर मराठे, विकास राणे, फुंदीलाल माळी, किरण पाटील, सुधाकर मराठे, महेंद्र लोहार, चेतन इंगळे, प्रवीण भारती, सम्राट महाजन, राकेश पवार, तुषार नाईक, नरेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले....









Sunday, 13 March 2016

सावरकरांच्या तलोद्या भेटीला 76 वर्ष

तळोदा स्वतंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या तलोद्यातील इतिहासाची साक्ष् देणारी बारगढ़ गढ़ीच्या भेटीला 76 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने गढ़ीत जाऊन सावरकर प्रतिमा पूजन करून बालगोपाला समोर सावरकरांच्या आठवणींना उजाळा देत स्मृति जागवल्यात. तळोदा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्वस्व झोकूनदेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारत भेटीत तळोद्यात दि.१३ मार्च १९४० रोजी भेट दिली होती. त्या भेटीला १३ मार्च २०१६ रोजी 76 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त त्याच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी बारगढ़ गढ़ीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सावरकर यांच्या तळोद्याचे जहांगीरदार शंकरराव बारगढ़ यांच्या हस्ते सत्कार केलेल्या दुर्मिळ प्रतिमेंचा पूजन व परिसरातील बाल गोपालांना स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देणारे सावरकर यांच्या धेर्याचा व शौर्याचा आठवणी बाळ गोपालांनी उत्सुकतेने श्रवण केल्या. पत्रकार संघातर्फे बालगोपालांना चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बारगड जहागीरदार यांचे वारस असलेले प्रसन्नकुमार बारगढ़, प्राचार्य अशोक वाघ, तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव उल्हास मगरे, फुंदीलाल माळी, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, किरण पाटिल, चेतन इंगळे, सम्राट महाजन आदीच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी प्रा अशोक वाघ यांनी मनोगतात सावरकर यांच्या कार्याचा स्मृती जागवल्यात...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. आभार ईश्वर मराठे यांनी मानले....










Tuesday, 8 March 2016

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा वतीने महिलांचा सत्कार व गौरव

जागतिक महिला दिना निमित्त; तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा वतीने काल एकूण 9 श्रमिक, विधवा महिलांचा सत्कार व गौरव साडी चोळी देऊन करण्यात आला. यावेळी भरत भामरे, प्रा. अशोक वाघ, ईश्वर मराठे, प्रा. बन्सीलाल भामरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, संघाचे सचिव उल्हास मगरे, किरण पाटील, सुधाकर मराठे, चेतन इंगळे, सम्राट महाजन, राकेश गुरव आदि उपस्थित होते.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ मागील तीन वर्षांपासून विविध विधायक उपक्रम राबवित असून; काल दि. 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून, तळोदा मराठी पत्रकार संघाने येथील स्मारक चौकातील पान विक्री करणाऱ्या आशाबाई किशन तांबोळी, कल्पना रतिलाल तांबोळी. झाड़ू विक्री करणाऱ्या सुलोचनाबाई वसंत अहिरे, आशाबाई त्र्यंबक म्हरसाळे. बूट पॉलिश करणाऱ्या सोनीबाई खंडू अहिरे, भागाबाई बाबुलाल अहिरे, सुमनबाई बन्सी अहिरे व कलिबाई वेडू अहिरे. आणि पाँव वडा विकणाऱ्या राजकोर बाई वानखेडे अश्या एकूण 9 महिलांची भेट घेऊन, सत्कार व गौरव साडी चोळी देऊन करण्यात आला. ह्या वयोवृध्द, विधवा, श्रमिक महिला गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तळोदे शहरातील मध्यवर्ती स्थान असलेल्या स्मारक चौकात, उन्हा - तान्हात बसून, वेगवेगळ्या व्यवसायातुन आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाह, तसेच आपल्या मुला - मुलींचे शिक्षण करीत आहेत. आपल्या तीन वर्षाची परंपरा कायम ठेवित, तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने हा आगळा वेगळा उपक्रम राबविला. संघाच्या या आदर्श व समाज हितकारक कार्याचे सर्वच क्षेत्रातुन स्वागत करण्यात येत आहे....