Tuesday, 28 June 2016

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

तळोदा राष्ट्रीय एकात्मता बंधु भाव सामाजिक सलोखा राखण्यात प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे समाज सलोख्यासाठीची पत्रकारांची भूमिका कौतुकास्पद असून मराठी पत्रकार संघाचा या उपक्रमातुन दिसून आले आहे असा सुर उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर,हिन्दू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमास आ उदेसिंग पाडवी, जि प उपाध्यक्ष सुहास नाईक , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, तहसीदार रामचंद्र पवार, पोलिस उप अधीक्षक गृह राजेंद्र रायसिंग,पं स उपसभापती दीपक मोरे, नायब तहसीलदार रिनेश गावीत, मौलाना शोएब रजा नूरी, मौलाना जुनेद हाफिज, पं स माजी सभापती आकाश वळवी, नगरसेवक संजय माळी, हाजी, नगरसेवक गौरव वाणी, निसारभाई मकरानी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे , अकबर शेख, अकील अंसारी, अॅड महबूब शेख, अक्रम पिंजारी, पोलिस निरीक्षक संजय भामरे, उध्दव पिंपळे, रईसअली अब्बास अली, अनिल माळी, माजी प्राचार्य अशोक वाघ, प्राचार्य सी एच राजकुळे, मनसे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, माजी नगरसेवक इम्तेयाज कुरेशी, भैय्या सरदार , सुलतान गनी, इम्तेयाज कुरैशी, शब्बीर पिंजारी अदि व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी, जि प उपाध्यक्ष सुहास नाईक, मौलाना शोएब रजा नूरी, मौलाना जुनेद हाफिज , पोलिस उपअधीक्षक गृह राजेंद्र रायसिंग, हाजी निसारदादा मक्राणी, आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की; इफ्तार पार्टी मुळे जातीया सलोखा जपन्यास मदत होते बंधुभाव भाईचारा अधिक वृंदिगत होतो तसेच तळोदा शहरात पूर्वीपासून असलेल्या या दोन्ही पंथियांचे एकीचा संबंधाचे दाखले दिलेत. हिन्दु - मुस्लिम या दोन्ही पंथियांनी गुण्या गोविंदयाने रहात, शहराची शांतता कशी टिकून राहील या बददल ही मार्गदर्शन केले. तसेच मराठी तालुका पत्रकार संघाने असे प्रभोधणात्मक कार्य पुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा सर्वांनी आपल्या मनोगनत व्यक्त केली. यावेळी मुस्लिम समाजातील लहान बालकांचा संपूर्ण एक महीना रोजे केलेल्या बालकांचा प्रमुख अथितींचा हस्ते सत्कार करुन त्यांना गिफ्ट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शेवटी सर्वांना वडे, खजूर व शरबत देण्यात आले, मुस्लिम बांधवांनी फराळ खाऊन आपला उपवास सोडले कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी यांनी केले तर सूत्र संचालन फुंदीलाल माळी यांनी आणि आभार संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष मंगेश पाटील, सचिव उल्हास मगरे, अशोक वाघ, भरत भामरे, ईश्वर मराठे, विकास राणे, फुंदीलाल माळी, किरण पाटील, सुधाकर मराठे, महेंद्र लोहार, चेतन इंगळे, प्रवीण भारती, सम्राट महाजन, राकेश पवार, तुषार नाईक, नरेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले....